जालना : टँकरची दुचाकीला धडक, चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू

23

सामना प्रतिनिधी । जालना

भरधाव टँकरने दुचाकीवरुन गावाकडे परतणाऱ्या दोघांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोघेही जागीच ठार झाले. ही घटना शहरातील संभाजी उद्यानासमोर मंगळवारी दुपारी 3वाजेच्या सुमारास घडली.

नितीन संतोष राठोड (15) व लक्ष्मणतुकाराम आढे (60) दोघेही रा. गोंदी तांडा ता. अंबड हे दोघे (एम.एच.20 झेड. 911) क्रमांकाच्या दुचाकीवरुन गावाकडे परत जात असतांना संभाजी उद्यानासमोर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या भरधाव पाण्याच्या टँकरने (क्र.एम.एच.04 डी.एस. 5979) त्यांना जोराची धडक दिली. यात पाठीमागच्या चाकाखाली येऊन दोघेही जण जागीच ठार झाले. या प्रकरणी रामेश्वर उत्तम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कदिम जालनापोलीस ठाण्यात सदरील टँकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या