कुपटी-इवळेश्वर खिंडीत ट्रॅक्टर पलटी, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

890

माहूर तालुक्यातील तांदळा येथील रोपवाटिकेतून किनवट तालुक्यातील मांडवा वन परिमंडळात रोपे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुपटी-इवळेश्वरच्या दरम्यान असलेल्या खिंडीत झालेल्या अपघातात दोघेजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सय्यद कासिम शेख कादरूद्दीन (35) रा. गोकुंदा तालुका किनवट आणि करण मारुती पिटलेवाड (30) रा.किनवट अशी मृतांची नावे आहेत. तर भास्कर तेलगराव सिडाम (22) रा.मांडवा असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर वाहन क्रमांक एमएच-26-के- 5472 असून तांदळा येथील रोपवाटिकेतून किनवट तालुक्यातील मांडवा वन परिमंडळात ट्रॅक्टरमध्ये रोपे घेऊन जात असताना हा अपघात घडला आहे. रस्ता सोडून ट्रॉली व ट्रॅक्टरचे हेड नालीत पडल्याने चालक व मजूर जागीच ठार झाले आहेत. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. चालक सय्यद आणि मजूर करण यांचा मृत्यू झाला. जखमी तरुणाला इवळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी माहूर येथे पाठवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या