>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ गावाशेजारी काही लहान मुले खेळात होती या लहान पोरांना खेळताना दोन जिवंत काडतूस खाली मातीत पडलेले सापडले . लगेच याची चर्चा पूर्ण गावभर पसरली आणि चर्चेचे एकाच पेव फुटले . पोलीस पाटलांनी घटनेचे गांभीर्य ओळखता तात्काळ ही माहिती लाडखेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विशाल हिवरकर यांना दिली . पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले . आणि अवघ्या काही तासातच आरोपीला अजून सात जिवंत काडतुससह अटक केली
यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत वागद येथे काही लहान मुले खेळात असताना त्यांना दोन जिवंत काडतुसे सापडली. ही माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अधिक चौकशी केली. चौकशी दरम्यान गावात बाहेरचा व्यक्ती नितीन ठाकरे हा मजुरीसाठी आला होता असे पोलिसांना चौकशीत समजले . पोलिसांनी त्यांच्यावर संशय व्यक्त करीत अधिकच तपास चालू केला असता आर्णी येथील त्याच्या राहत्या घरी आणखीन सात जिवंत काडतूस सापडले. आरोपी नितीन ठाकरे याच्या विरुद्ध शस्त्र बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.लाडखेड पोलीस अधिक तपास करीत आहेत