गडचिरोलीत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक, दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

404


गडचिरोलीत नरकसा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ग्यारापत्ती जंगल परिसरात मोतीराम मडावी यांच्या नेतृत्वाखाली सी – 60 चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. या चकमकीत दोन नक्षली ठार झाले आहेत. त्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. तसेच काही नक्षलवादी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

आपली प्रतिक्रिया द्या