उरणमध्ये तीन लाखांचा गुटखा जप्त: दोघांना अटक, तीनजण फरार

उरण शहरातील आंदनगरमधील एका होलसेल विक्रेत्यांकडून 3 लाखाचा गुटखा उरण पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली असून इतर तीनजण फरार झाले आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

उरण शहरात गुटखा विकला जात असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाने उरण पोलिसात केली होती. या तक्रारीनंतर उरण शहरातील आंदनगरमधील तंबाखूच्या होलसेल विक्रेत्याच्या दुकानावर धाड टाकली असता विमल व महक सिल्व्हर पान मसाला यांचा अवैध साठा आढळून आला. या मालाची बाजारभावाने किंमत 3 लाख 12 हजार 744 रुपये आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मनोरंजन गिरी व शिवा मुरली अधिक यांना अटक केली असून कल्लू, गुप्ता व कैलास गुप्ता हे तीनजण फरार आहेत. यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कावळे पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या