गृहपाठ केला नाही म्हणून रचले अपहरणाचे कुभांड, दोन अल्पवयीन मुलींचा प्रताप

989

गृहपाठ केला नाही म्हणून पूर्वी लहान मुलं पोटात दुखत असल्याची खोटी तक्रार करत आणि शाळेला दांडी मारायाच्या बेतात असत. परंतु पालघरमध्ये दोन शाळकरी मुलींनी गृहपाठ केला नाही. शिक्षा होऊ नये म्हणून दोन्ही मुलींनी अपहरण झाल्याचा बनाव केला होता.

11 वर्षाच्य दोन मुली एका शाळेत चौथीत शिकत होत्या. शिक्षिकेने त्यांना गृहपाठ दिला होता. गृहपाठ न केल्यास पालकांकडे तक्रार केली जाईल अशी भिती त्यांनी विद्यार्थ्यांना घातली. याला घाबरून दोन मुलींनी आपले अपहरण नाट्य रचले.

दोघींनी मीरारोड विरार गाडी पकडली. विरारहून एका ज्युस वाल्याच्या मोबाईलवरून एकीने आपल्या वडिलांना फोन केला. आपले अपहरण झाल्याचे तिने सांगितले. तेव्हा दोन्ही मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी या मुलींची शोधाशोध सुरू केली. तेव्हा सांयकाळी दोन्ही मुली घरी आल्या.

घरी आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलींची चौकशी केली. परंतु दोन्ही मुलींनी सांगितलेला घटनाक्रम वेगळा होता.एका मुलीने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार शाळेच्या आवारात एका महिलेने त्यांना जबरदस्ती गाडीत बसवले. चाकूचा धाक दाखवून त्यांना गप्प बसण्यास सांगितले. नंतर त्या महिलेला चक्ववा देत आपण खाली उतरले. खूप गर्दी असल्याने ती बाई आपला पाठलाग करू न शकल्याचे मुलीने सांगितले. परंतु दुसरी मुलगी वेगळंच काही सांगत होती.

अखेर पोलिसांनी थोडी दमदाटी करताच दोघींनी खरे काय ते सांगितले. तसेच टीव्ही वरील क्राईम शो पाहून ही कल्पना आपल्याला सुचल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही मुलींना समजावून घरी पाठवले.

आपली प्रतिक्रिया द्या