धाराशिवमध्ये दोन रुग्ण कोरोनामुक्त

915

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हावरगाव येथील दोन सख्या बहिणी आपल्या पतीसह मुंबई येथुन आल्या होत्या. दोन बहीणी पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला

मुंबई येथुन हावरगाव येथे आल्याने दोन सख्या बहिणी पती पत्नीला जाधव वस्तीवर क्वारंटाईन करण्यात आले होते. 16 मे रोजी रोजी त्यांचे स्वॅब घेण्यात आले. 17 मे रोजी लातुर येथील वैद्यकीय प्रयोगशाळेतुन दोन बहिणींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर पतीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्या दोन बहिणींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

चौदा दिवस त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून आरोग्य विभागाचे या वर लक्ष असेल, असे वैद्यकीय अधिक्षक डॉ जीवन वायदंडे यांनी सांगितले. या पूर्वी पाथर्डी येथील पती पत्नीने कोरोनावर मात केल्याने डीस्चार्ज देण्यात आला होता.  आतापर्यंत चार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले असुन कोरोना बाधीत रुग्णांचे संपर्कातील संसर्ग होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून येत आहे

आपली प्रतिक्रिया द्या