दोन हजार रुपयांची नोट अजूनही वैध, रिझर्व्ह बँकेचा निर्वाळा; हजार कोटी रुपये किंमतीच्या नोटा अजूनही चलनात

दोन हजार रुपयांची नोट अजूनही वैध आहे असा निर्वाळा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. तसेच आतापर्यंत दोन हजार नोटांच्या एकूण 97.96 टक्के नोटा परत आल्या आहेत असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

19 मे 2023 पर्यंत देशात 3.56 लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या किंमतीच्या नोटा चलनात होत्या. आता यापैकी फक्त 7 हजार 261 कोटी रुपये किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत. रिझर्व्ह बँकेकडे दोन हजार रुपयांच्या एकूण नोटांपैकी 97.96 टक्के नोटा परत आल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही वैध आहेत असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

ज्यांच्याकडे अजूनही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील ते रिझर्व्ह बँकेत जमा करू शकतात. देशभरात रिझर्व्ह बँकेच्या 19 शाखांमध्ये नागरिक या नोटा जमा करू शकतात.