तारकर्ली समुद्रात बोट पलटी होऊन 20 पर्यटक बुडाले; दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तारकर्ली पर्यटन केंद्र समोरील समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणारी बोट पलटी होऊन अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. बोटीवरील 20 जण पाण्यात फेकले गेले यात सहा मुलांचा समावेश आहे.

स्थानिकांनी मदतकार्य राबवत समुद्रात बुडलेल्या पर्यटकांना बाहेर काढले. अत्यवस्थ बनलेल्या पर्यटकांना तत्काळ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. यातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे तर अन्य एका गंभीर स्थितीतील महिला पर्यटकाला खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले आहे. सुदैवाने या दुर्घटनेतील सहा मुलांचा जीव वाचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे अकोला तसेच अन्य भागातील काही पर्यटक महिला लहान मुलांसह तारकर्ली येथील समुद्र किनारी पर्यटनासाठी आले होते. पर्यटनाचा आंनद लुटत असताना बोट अचानक पलटी झाली. त्यामुळे या बोटीवरील सर्व पर्यटक महिला व लहान मुले पाण्यात फेकली गेली. अचानक घडलेल्या या प्रकारा मुळे किनारपट्टी भागात खळबळ उडाली.

बुडालेल्या सर्वांना किनाऱ्यावर आणण्यात आले. यात अत्यवस्थ बनलेल्या पर्यटकांना तत्काळ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. यात उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अन्य एक महिला पर्यटक गंभीर असल्याने तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या दुर्घटनेत सहा तीन दीड ते तीन वर्षाची मुले पाण्यात फेकली गेली होती. या मुलांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले सुदैवाने या सर्वांचे प्राण वाचले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.