स्क्रब टायफसमुळे आणखी दोन महिलांचा मृत्यू

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नागपूर

स्क्रब टायफस या जंतुसंसर्गातून होणाऱ्या आजारामुळे गुरुवारी आणखी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या आजारामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

चित्रलेखा साहू आणि सिमा भलावी या दोन्ही महिलांना गेल्या आठवड्यात स्क्रब टायफसचं निदान झालं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण प्रकृती खालावल्याने, काल दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.