विवाहितेसह युवतीचा शेततळ्यात पडून मृत्यू; मुधोलीतील घटना

641

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील शेतामध्ये कामासाठी गेलेल्या विवाहितेसह युवतीचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणाची भद्रावती पोलिसांनी नोंद केली आहे. मनीषा रामभाऊ चौधरी (वय 22) आणि पोर्णिमा यशपाल चौधरी (वय 15, दोघी रा. मुधोली) अशी मृतांची नावे आहेत. रामभाऊ चौधरी यांच्या शेतात त्यांची पत्नी आणि नातलग असणारी युवती शेताचे काम करण्यासाठी गेले होते. शेतातील काम संपल्यावर शेततळ्याजवळ हात-पाय धुण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी युवतीचा पाय घसरल्याने ती शेतळ्यात पडली. तिला वाचविण्यासाठी मनीषा गेली असता तीदेखील पाण्यात पडली. दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या