
सामना ऑनलाईन। यवतमाळ
मोहरमनिमित्त यवतमाळ येथे आलेल्या दोन तरुणांचा सेल्फीच्या नादात बुडुन मृत्यू झाला आहे. शेख अर्शद आणि शेख सुफीर सिराज अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेत बचावलेल्या इतर तीन तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे सर्व तरुण आदिलाबादचे असून यवतमाळ फिरायला आले होते. बोटीतून ते पैनगंगा नदीपात्रात सैर करत होते. त्याचवेळी अशद ,सुफीर व इतर तीन तरुण सेल्फी काढण्यासाठी बोटीच्या एका बाजूला आले. यामुळे बोटीचा तोल बिघडला व ती कलंडली, यामुळे सर्व तरुण पाण्यात पडले. यातील तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना य़श मिळाले. पण अर्शद आणि सुफीर यांचा मात्र नदीत बुडुन मृत्यू झाला.






























































