नांदेडमध्ये मांजरा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बिलोली 

येसगी येथील मांजरा नदीपात्रात कासराळी येथील दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील कासराळी येथील नवाज नजीर कुरेशी (२१), इफ्तेखार मोईज शेख (२०) व  हे दोघे मित्रांसोबत बोधन येथून परत येत असताना तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या येसगी येथील मांजरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. परंतु पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे खोल डोहात पडल्याने त्यांचा पाण्यातच मृत्यू झाला. बुडाल्याची माहिती मिळताच पी.एस.आय. पंतोजी यांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक भोईच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले. जागेवर पंचनामा करून बिलोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.