धुळवडीला गालबोट, राज्यात ठिकठिकाणी 13 जण बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

धुळवड साजरी करण्यासाठी पोहायला गेलेल्या राज्यात ठिकठिकाणी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे, रायगड व पालघरमध्ये 9 व बदलापूर, रायगडमध्ये प्रत्येकी दोन जण बुडाले आहेत.

वसईमध्ये अर्नाळा समुद्रकिनारी काही व्यक्ती समुद्रामध्ये होळी साजरी करण्यासाठी गेले असता, त्यामधील 5 व्यक्तींचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व इतर अधिकारी उपस्थित असून आद्याप शोधकार्य सुरू आहे तसेच भारतीय तटरक्षक दलास कळविण्यात आले आजे.

बदलापूर मध्येही बॅरेज धरणात पोहोण्यासाठी गेलेले दोन जण बुडाले आहे. तसेच रायगड कर्जतमध्ये पाषाणे नदीत दोन जण बुडाले आहेत.