बुलढाण्यात टायपिंग परीक्षेत घोटाळा, केंद्रप्रमुखावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे घेत असलेल्या इंग्रजी विषयाच्या ऑनलाईन संगणक टंकलेखन परीक्षेत चिखली येथे मोठा घोटाळा उघडकीस आला. अनुराधा इंजिनीअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 14 विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष 22 विद्यार्थ्यांनी ऍक्सेस घेतल्याचे दिसून आले. उर्करित विद्यार्थी हे घरूनच परीक्षा देत असल्याचे उघडकीस आल्याने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडीओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखविण्यास सांगितले. मात्र त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त 14 विद्यार्थी परीक्षा देत होते क इतर 8 विद्यार्थी कुठे आहेत, असे विचारले गेले असता केंद्रप्रमुख निरुत्तरीत झाले. या परीक्षेचा युजर आयडी व पासवर्ड हा फक्त केंद्रप्रमुख यांच्याकडेच असतो. तरीही हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले? त्यामुळे बुलढाणा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तत्काळ हे केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला.