
जागतिक पातळीवर अॅप बेस टॅक्सी सेवा पुरवणाऱया ‘उबर’ कंपनीने मुंबईतील आपले कार्यालय बंद केले आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसायाला फटका बसल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे बोलले जात आहे. कार्यालय बंद केले असले तरी टॅक्सी सेवा सुरू राहील असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कोरोना संकटाचा टॅक्सी सेवेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे उबर कंपनीने मुंबईबरोबरच जगभरातील 45 कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊननंतर उबरचे अनेक कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. पण नव्या फेरबदलांमध्ये वाहन चालक, कस्टमर केअर विभाग येथील शेकडो कर्मचाऱयांची नोकरी जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.























































