
अॅप आधारित खासगी टॅक्सी सेवा असलेल्या उबरच्या चालकांकडून फोनद्वारे, ‘कुठे जायचे आहे?’ हे विचारून ट्रीप कॅन्सल करण्याचे वाढते प्रकार आणि त्यावरून प्रवासी आणि चालकांमध्ये होणारी वादावादी थांबविण्यासाठी आता कंपनीने ड्रायव्हरला ट्रिप बुक करण्याआधी प्रवाशाचे ‘डेस्टीनेशन’ आधीच कळण्याची सोय केली आहे. तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वी ड्रायव्हरला पैसे रोख हवेत असा पर्याय निवडण्याचाही अधिकार राहणार आहे.
उबरच्या ड्रायव्हर आणि प्रवाशांमध्ये भाडे नाकारण्यावरून होणारे वादंग टाळण्यासाठी ड्रायव्हरना अॅपवर ट्रीप स्वीकारण्यापूर्वी प्रवाशाचे ‘डेस्टिनेशन’ कळण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याला त्या दिशेने जायचे आहे, त्यालाच संदेश जाऊन तो ड्रायव्हर तेथे पोहचेल.
ट्रीप सुरू करण्यापूवी ड्रायव्हरला पेमेंट कॅश की ऑनलाइन मिळणार हेसुद्धा दिसेल, त्यामुळे कॅश रक्कम हवी असणाऱया चालकांना फायदा होईल असे उबेरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.


























































