रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांसाठी समन्वयावर भर देणार – उदय सामंत

524

रत्नागिरी जिल्ह्यात विकास कामे करत असताना प्रशासन आणि नागरिक यांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. चिपळूणमधील शासकीय विश्रामगृहात त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे परशुराम येथील कामांबाबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने लवकरात लवकर होणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी या विकासात्मक कामात मदत करावी. या कामामध्ये दोन्ही बाजूंनी सकारात्मक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. जे प्रकरण न्यायालयामध्ये आहे, त्या ठिकाणी कोर्टाच्या निर्णयानुसार प्रशासन काम करेल असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या आपण त्यांचा प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ पातळीवर मांडू असे त्यांनी सांगितले. प्रशासन येथील जनतेला लागेल ती मदत करायला तयार आहे असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.या बैठकीला आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या