एलईडी मासेमारी बंद झालीच पाहिजे – पालकमंत्री उदय सामंत

मालवण समुद्रातील एलईडी लाईट मासेमारी बंद झालीच पाहिजे, आणि ती करणारच. अशी भूमिका सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मालवण येथे बोलताना स्पष्ट केली. अनधिकृत एलईडी मासेमारीवर कारवाई सुरूच राहणार असून सिंधुदुर्ग मत्स्य विभागाला लवकरच सुसज्ज गस्ती नौका देणार असून रिक्त पदेही भरली जातील. असेही सामंत यांनी सांगितले.युवासेनाप्रमुख तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बीच महोत्सव आयोजित केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘सिंधू बीच’ महोत्सव मालवण किनारपट्टीवर होईल, अशी ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी दिली.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या उदय सामंत यांचे मालवणात तालुका शिवसेना व स्वराज महिला ढोलताशा पथकाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, समन्वयक बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेसचे नेते साईनाथ चव्हाण, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आगोस्तीन डिसोजा, नगरसेवक मंदार केणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या