राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने समाजसेवक उदय सर्वगोड सन्मानित

222

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवक उदय ज्ञानू सर्वगोड यांना नुकतेच ‘राष्ट्रीय समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सेव्हन वंडर्स पब्लिकेशनच्या वतीने शिर्डीत आयोजित 12 व्या अखिल भारतीय प्रतिभा संमेलनात रविवारी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आशिया खंडातील अकरा देशांमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध प्रेरणा संमेलनांचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शिर्डीमध्ये एक दिवसीय ‘१२ वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन – २०१९’ चे आयोजन करण्यात आले होते.

उदय ज्ञानू सर्वगोड हे मागील अनेक वर्षापासून मुंबईसह महाराष्ट्रभरात सामाजिक सेवेचा वसा घेऊन कार्य करत आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवेचा गौरव म्हणून त्यांना हिंदुस्थानी वायू दलाचे माजी उपसेनापती लेफ्टनंट जनरल गुरुमित सिंग,पद्मश्री विजयकुमार शहा, संमेलनाध्यक्ष राम गायकवाड, रानकवी जगदीप वनशिव, संयोजक क्रांती महाजन यांच्याहस्ते राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबईतील नागोराव तायडे यांना जीवन गौरव पुरस्कार तर ज्योती नेटवटे याना ‘राष्ट्रीय शिक्षकरत्न’ पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. पुरस्कार हे आपल्या आयुष्याला प्रेरणा देतात. त्यामुळे समाजरत्न पुरस्कार मिळाल्याने आता कामाची जबाबदारी आणखी वाढली असून हा पुरस्कार समाजात कार्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे, असे उदय सर्वगोड यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या