उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश

3090

 • मी उदयनराजे यांचे पुनश्चः अभिनंदन करतो- अमित शहा
 • या कामी उदयनराजे यांचा भाजप प्रवेश सहाय्यकारी ठरेल आणि मला विश्वास वाटतो की महाराष्ट्राची जनता आमच्या अभियानाला पुढे नेईल.
 • विधानसभेत भाजप अजून मजबूत होऊन महाराष्ट्रात युतीचं सरकार येईल, हा माझा विश्वास आहे.
 • 2014, 2019 लोकसभा या निवडणुकांमध्ये आम्हाला जे घवघवीत यश मिळालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा विधानसभेत होईल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
 • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या प्रकारे पाच वर्षं सरकार चालवलं आहे, ते पाहून जनता भाजपशी जोडली गेली आहे.
 • महाराष्ट्रात लोकसभेत जितकं यश मिळालं त्याहून जास्त विधानसभेत यश मिळेल हे निश्चित आहे.
 • भारतीय जनता पक्ष त्याच्या स्थापनेपासूनच शिवछत्रपतींनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहे. आणि आज त्यांचेच वंशज भाजपमध्ये आले आहेत. आम्ही सर्व आनंदी आहोत आणि त्यांचे स्वागत करतो
 • निवडून आल्यानंतर तीनच महिन्यांत लोकसभेच्या खासदारपदाचा राजीनाम देऊन आज उदयनराजे यांनी पक्षप्रवेश केला आहे.
 • भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांतर्फे मी त्यांचं पक्षात स्वागत करतो
 • शिवछत्रपतींनी कठीण परिस्थितीतही स्वदेश आणि स्वधर्म यांच्या रक्षणार्थ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यांचेच वंशज उदयनराजे आज भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत.- अमित शहा
 • उदयनराजे यांच्या भाजपमध्ये येण्याने पक्ष आणि समाज यांना लाभ होईल, असा मला विश्वास वाटतो- मुख्यमंत्री
 • नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये रायगड येथे छत्रपतींच्या आशीर्वादानेच प्रचाराला सुरुवात केली होती. आणि छत्रपतींच्या आशीर्वादानेच आम्हाला सत्ता मिळाली. आता त्यांच्याच विचारांवर आम्ही पुढे जात आहोत.
 • तुमच्या येण्याने एक नवीन ताकद भाजपला मिळाली आहे.
 • तुम्ही राजे असूनही तुम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहात, म्हणूनच जनतेचं प्रेम तुम्हाला मिळालं आहे.
 • या देशात स्वराज्यभावना जागृत करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं होतं.
 • जेव्हा मोदी देशहितासाठी एखादा निर्णय घेत असतील तर छत्रपतींच घराणं कसं मागे राहिल, असंही तुम्ही म्हटलं होतं
 • जेव्हा 370बाबत निर्णय घेतला तेव्हा तुम्ही त्याची प्रशंसा केलीत.
 • गेल्या अनेक वर्षांपासून आपण सक्रिय राजकारणात आहात.
 • छत्रपती शिवरायांचं नाव घेताच आपल्या मनात आदर आणि उर्जा निर्माण होते, त्यांच्या घराण्याचं नाव ज्यांनी मोठं केलं त्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा त्याग करून भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे.
 • स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील एक वंशज भाजपमध्ये आल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 • उपस्थित सर्व मान्यवरांचे धन्यवाद- उदयनराजे
 • लोकांच्या सेवेत राहण्याची आमची जी परंपरा आहे, ती कायम राखत जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा कायम प्रयत्न करेन.
 • देशात पहिल्यांदाच हे पाऊल कुणीतरी उचललं आहे. तुमच्या कार्यकाळातल्या शेवटच्या तीन महिन्यात कुणीही राजीनामा देईल, पण लोकहितासाठी मी सुरुवातीच्या तीन महिन्यातच हा निर्णय घेतला, कारण माझे विचार मोदी यांच्या विचारांशी मिळतेजुळते आहेत.
 • त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलून मी हा निर्णय घेतला.
 • समविचारी व्यक्तींना सामावून घेण्यासाठी वेगळी ताकद लागत नाही. कारण त्यांचं उद्दिष्ट एकच असतं
 • कुणाचे विचार वेगळे असूही शकतील. पण ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात लोकं भाजपशी जोडली जात आहेत, ते कुणाच्या सांगण्यावरून जोडले जात नाहीत
 • पण, देशाची अखंडता कायम राहावी म्हणून पंतप्रधानांनी उचललेली पावलं योग्य आहेत- उदयनराजे भोसले
 • लहानपणापासून कश्मीरविषयी ऐकत आलो, पण तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही.
 • प्रत्येक राज्यात भाजपची ज्या प्रकारे प्रगती होत आहे, त्यामागचं हे एकमेव कारण आहे
 • छत्रपतींच्या विचारांवरच भाजप पुढे जात आहे.
 • या लोकशाहीला अजून मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजप करत आहे.
 • छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला सर्वधर्मसमभावाचा विचार दिला. लोकशाहीसाठी जो परिपाठ त्यांनी घालून दिला त्यावरच आजची देशाची लोकशाही सुरू आहे- उदयनराजे
 • राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करून सातारा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
आपली प्रतिक्रिया द्या