उदयनराजे शरद पवारांना भेटले;मराठा आरक्षणावर झाली चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी कॉँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झालेले खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात असतानाच खुद्द उदयनराजे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी या भेटीत चर्चा झाली. तसेच हा विषय राजकीय नसल्याचे स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या खटल्यात राज्य सरकारचे वकील व्यवस्थितपणे बाजू मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शरद पवार यांनी या सगळ्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालावे, अशी विनंती आपण त्यांना केली.

अन्य समाजातील लोकांना ज्याप्रमाणे आरक्षण दिलं गेलं. त्याचप्रमाणे कुणाचाही आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजालादेखील आरक्षण मिळालं पाहिज ही आमची भूमिका आहे. शरद पवार हे मराठा समाजातील ज्येष्ठ व राजकारणात सक्रीय नेते आहेत. आज राज्यात महाविकास आघाडीची जी सत्ता आहे, त्याचे सर्वेसर्वा शरद पवार हे आहेत. त्यामुळे एक वडिलकीच्या नात्याने त्यांनी यामध्ये लक्ष घालावं, असं ते म्हणाले.