
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस होता. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
































































