उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची उद्या हॉटेल ब्लू सीमध्ये दुपारी 12 वाजता संयुक्त पत्रकार परिषद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या 24 डिसेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद वरळीतील हॉटेल ब्लू सीमध्ये होणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता असून याआधी संजय राऊत यांनीच शिवसेना-मनसे युतीची दोन दिवसात घोषणा होईल अशी माहिती दिली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. महायुतीतील पक्षांचे आता बारा वाजणार, अशी प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत.