जनसंवादाचा झंझावात आजपासून मराठवाड्यात, उद्धव ठाकरे यांचा 2 दिवसांचा दौरा; हिंगोली मतदारसंघात तोफ धडाडणार

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाडय़ात उद्यापासून दोन दिवसांचा झंझावाती जनसंवाद दौरा करणार आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस उद्धव ठाकरे जनसंवाद सभांतून मार्गदर्शन करणार आहेत.

भाजपची हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या जनसंवादाचे तुफान आले असून हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्या वसमत, सेनगाव, कळमनुरी तर मंगळवारी उमरखेड आणि अर्धापूर येथे उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत.

आज

वसमत – सकाळी 11.30 वा.

सेनगाव – दुपारी 3 वा.

कळमनुरी – सायंकाळी 6 वा.

उद्या

उमरखेड – सकाळी 11.30 वा.

अर्धापूर – दुपारी 3 वा.