
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विशाल मैदानावर ‘शिवगर्जना’ घुमणार असून शनिवार, 10 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट सभा होणार आहे. या सभेत शहरासाठीचा वचननामाही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून शहर भगवेमय झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी शिवसेनेचे 97 शिलेदार मैदानात असून, तीन उमेदवारांना पक्षाने पुरस्कृत केले आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराने शहर भगवेमय झाले आहे. शिवसैनिकांच्या पदयात्रा, मशाल रॅली, कॉर्नर सभांनी शहर दणाणून गेले असून उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साहाचे वातावरण आहे.





























































