विश्वास फाऊंडेशनच्या बोईसर येथील भव्यदिव्य रास रंग नवरात्रोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. बोईसर रास रंग हा पालघर जिह्यातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव असून हजारो तरुणाईचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे.
शिवसैनिक व विश्वास फाऊंडेशनचे डॉ. विश्वास वळवी हे दरवर्षी बोईसर येथे नवरात्रोत्सव आयोजित करतात. यंदाही सर्कस ग्राऊंडवर हा सोहळा होणार असून अनेक सिनेतारका उपस्थित राहणार आहेत. ‘मातोश्री’ निवासस्थानी विश्वास वळवी यांच्या रास रंग नवरात्रोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, पालघर जिह्याचे संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य, सहसंपर्कप्रमुख गिरीश राऊत, जिल्हाप्रमुख अजय ठाकूर, अनुप पाटील, पंकज देशमुख उपस्थित होते.