हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्याने दिमाखदार प्रारंभ झाला. अवघे षण्मुखानंद सभागृह खच्चून भरले होते. याच गर्दीच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी मुंबई-महाराष्ट्र गिळायला निघालेल्या भाजपच्या दिल्लीश्वरांवर हल्ला चढवला. ‘मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून जगणार नाही अशी शपथ घ्या’, असे खणखणीत आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.



























































