
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका आणि भिवंडी ग्रामीण विधानसभेतील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातावर शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते-सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे, उपनेते विश्वास थळे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.































































