
मुंबई शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या स्थानिक विकासनिधीतून आज एम. आय. जी. क्लब, वांद्रे पूर्व येथे मुंबईतील विविध शाळांकरिता ‘डिजीटल स्मार्ट बोर्ड’ वितरण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना-युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर तसेच शिवसेना आणि शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
































































