उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा

951
प्रातिनिधिक फोटो

उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण व कुमदाळ (हेर) ता. उदगीर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सूर्यवंशी यांच्याविरुद्ध दहा हजाराची लाच मागितल्याप्रकरणी उदगीर येथील शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुमदाळ (हेर) ता. उदगीर येथील प्राप्त मुळ तक्रारीवरून सापळा रचून कार्यवाही दरम्यान यातील लोकसेवक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकूश चव्हाण दोन जुलै रोजी पंचासमक्ष ठरलेले तक्रारदारांचे कुमदाळ ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या मोटारीचे ५९ हजार बील व अंगणवाडी साहित्याचे ११,२०० बिलाच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी व यापूर्वी काढलेल्या एलईडीचे १ लाख ४८ हजार असे एकूण तीन लाखाच्या बिलाच्या दोन टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली.

सदर लाचेची रक्कम तीन जुलै रोजी देण्यासाठी गेले असता सदर रक्कम गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकास देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी चार जुलै रोजी अकरा वाजून १५ मिनीटाला ग्रामसेवक प्रल्हाद सूर्यवंशी यांची पंचायत समिती येथे पंचासमक्ष भेट घेऊन गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे आपण दहा हजार रुपये साहेबांना देऊ असे म्हणून लाचेची मागणी केली.

ठरलेली लाचेची रक्कम घेण्याचा संशय आल्याने जाणून बुजून टाळले म्हणून या दोघांविरुद्ध कायदेशीर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जुलैपासून लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या विभागाच्या वतीने या प्रकरणातील चौकशी करून सर्व पुरावे गोळा केले. ठोस पुरावे मिळाल्यानंतर व सदर लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दराडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या