भाजपवर टीका करण्याच्या नादात राष्ट्रपतींचा अपमान, उदीत राज यांची जीभ घसरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

तिकीट न मिळाल्याने भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या उदीत राज यांनी भाजपवर टीका करण्याच्या नादात थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा अपमान केला आहे. भाजपमध्ये मुक्या बहिऱ्यांना चांगली पदे मिळतात असं उदीत राज यांनी म्हटलं रामनाथ कोविंद यांचे उदाहरण देत त्यांनी हे विधान केल्याने त्यांनी थेट राष्ट्रपतींचाच अपमान केला आहे.

उदीत राज यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले की ‘ 2014 साली रामनाथ कोविंद त्यांच्याकडे बायोडेटा घेऊन आले होते. आपल्याला पक्षात चांगले पद मिळावे अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. कोविंद हे पहिले राज्यपाल झाले आणि नंतर राष्ट्रपती.’  भाजपमध्ये मुक्या बहिऱ्यांना चांगली पदे मिळतात अशी टीका यानंतर उदीत राज यांनी केली. मी मुका बहिरा असतो तर मलाही मंत्रीपद मिळालं असतं असं सांगायलाही ऊदीत राज विसरले नाहीत.