‘आधार’ आणखी सुरक्षित, यूआयडीएआयने लाँच केला ‘सिटा’ प्रोग्रॅम

‘आधार’ हा आपल्या देशातील अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. ‘आधार’ला अधिक सुरक्षित करण्यासाठी यूआयडीएआयने ‘सिटा’ प्रोग्रॅम लाँच केला आहे. ‘सिटा’ म्हणजे स्कीम फॉर इनोवेशन अँड टेक्नोलॉजी असोसिएशन विथ आधार. ‘सिटा’ प्रोग्रॅममुळे डीपफेक आणि फेक आयडीपासून सुटका होणार आहे. या प्रोग्रॅमअंतर्गत यूआयडीएआय आता स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रासोबत मिळून काम करेल. जेणेकरून ‘आधार’ सिस्टम आणखी सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह होईल.

देशातील डिजिटल व्यवस्थेचा पाया मजबूत करणे हे ‘सिटा’ प्रोग्रॅमचे वैशिष्ट्य आहे. ‘सिटा’ प्रोग्रॅमअंतर्गत एआयआधारित अत्याधुनिक उपाययोजना केल्या जातील. रियल टाईम डीपफेक ओळख, फेस लाइवनेस डिटेक्शन, कॉन्टॅक्टलेस फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन यांसारख्या तंत्रज्ञानांना प्रोत्साहन दिले जाईल. यूआयडीएआयने यासाठी इनोवेशन प्रस्ताव मागवले आहेत. प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2025 आहे. या प्रोग्रॅमसाठी यूआयडीएआयने मेटी स्टार्टअप अॅप आणि नॅस्कोमसोबत भागीदारी केली आहे.

  • ‘सिटा’ प्रोग्रॅमअंतर्गत स्टार्टअपमध्ये असे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कीट बनवले जाईल, जे डीपफेक, मास्क किंवा फोटो स्पुफिंगसारख्या हल्ल्याला ओळखू शकेल.
  • यूआयडीएआयला असे प्रस्ताव अपेक्षित आहेत, ज्यात स्मार्टफोन कॅमेरा किंवा सेन्सरच्या मदतीने हात न लावता फिंगरप्रिंट्स ओळखले जातील.
  • ‘सिटा’ प्रोग्रॅम डीपफेक, बायोमेट्रिक फ्रॉड यासारख्या धोक्यांपासून वाचण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करेल.