महाकाल मंदिरात भस्मआरती दरम्यान भक्ताचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

उज्जेनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात सोमवारी एक दुःखद घटना घडली आहे. भस्म आरतीसाठी आलेल्या एका भक्ताचा ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने मृत्यू होण्याच्या काही वेळापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांना बहुतेक मृत्यूची चाहूल लागली होती असे वाटते.

उज्जैनच्या पार्श्वनाथ शहरात राहणारे सौरभराज सोनी चहाचे दुकान चालवत होते. ते दर सोमवारप्रमाणे, दिवाळीनिमित्त सोमवारी पहाटे 1 वाजताच्या सुमारास सौरभराज महाकालच्या भस्म आरतीत सहभागी होण्यासाठी मंदिरात पोहोचले. देवाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते गेट क्रमांक 1 वर कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सौरभराज यांच्या मित्रपर्वाराच्या म्हणण्यानुसार त्यांना मृत्यूपूर्वीच मृत्यूची जाणीव झाली होती. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटसवर लिहीले होते की, आयुष्य क्षणभंगुर असल्याचा संदेश त्यांना स्टेटसवरुन दिला होता. सौरभराज दर सोमवारी भस्म आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी महाकाल मंदिरात जातात, यावरून त्यांची अढळ श्रद्धा दिसून येते.