राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू असतानाच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात येणाऱ्या अनगर नगरपंचायतीमध्ये धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे.

























































