उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम होणार सुरु, पोचमपाड कंपनीला दिली वर्कऑर्डर

उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम आता लवकरच सुरू होणार असून, काही दिवसांत सोलापूरकरांना नियमित पाणी मिळण्याची आशा निर्मान झाली आहे. कारणही तसेच आहे. उजनी धरण ते सोलापूर दुहेरी पाइपलाइनच्या कामाची वर्क ऑर्डर पोचमपाड कंपनीला देण्यात आली आहे. याबाबत सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पेरेशनच्या सीईओ शीतल तेली-उगले यांनी माहिती दिली आहे.

सोलापूर शहराची जीवनदायिनी मानली जाणाऱया दुहेरी जलवाहिनीचे काम आता लककरच सुरू करण्यात येत आहे. हे काम करण्यासाठी पोचमपाड कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. यामुळे या कामाचा मार्ग आता सुकर झाला आहे.

उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामासंदर्भातील जुना मक्तेदार पोचमपाड कंपनीने लवादाकडे धाव घेतली होती. त्या संदर्भात 28 एप्रिल 2023 रोजी सुनावणी झाली. पुणे येथे निवृत्त न्यायाधीश साठे यांच्यापुढे ही सुनावणी पार पडली होती. निवृत्त न्यायाधीश साठे यांनी या तडजोड प्रस्तावास मंजुरीही दिली. त्यानंतर आता सिटी डेक्हलपमेंट कार्पेरेशनकडून पोचमपाड कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे, त्यामुळे हे काम गतीने मार्गी लागेल.

उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम सुरुवातीला 110 एमएलडी आणि त्यानंतर नव्या टेंडरप्रमाणे 170 एमएलडी काम करण्यात येणार आहे. ‘लक्ष्मी’ला 637 कोटी रुपयांमध्ये या कामाचा मक्ता देण्यात आला होता. त्यानंतर आता तडजोडीनंतर पोचमपाड कंपनी हे काम करणार आहे. 20 कोटींनी हे काम कमी करण्यात आले. नवे आणि जुने असे मिळून एकूण 667.83 कोटी रुपयांमध्ये हे काम पोचमपाड कंपनी करणार
आहे. पोचमपाड कंपनीने यापूर्वी 59 कोटी रुपयांचे काम आधीच केले आहे. ते पैसेही अदा करण्यात आले आहेत. एकूण या प्रकल्पाची किंमत सध्या 667.83 कोटी आहे.

18 महिन्यांत काम पूर्ण होणार

– उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम नियोजन ठरल्याप्रमाणे करण्यात येणार आहे. कराराप्रमाणे हे काम 18 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. तीन महिने परीक्षणासाठी (ट्रायल) देण्यात येत आहे. अशी एकूण 21 महिन्यांत ही जलवाहिनी कार्यान्वित होईल. येत्या दोन महिन्यांत जॅककेलचे काम करण्यात येणार आहे.

पावसाळ्यापूर्वी जॅकवेलचे काम करावे लागणार

– सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या उजनी समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्क ऑर्डर दिल्याने आता लवकर काम सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उजनी धरण परिसरातील जॅककेलचे काम पाकसाळा सुरू होण्यापूर्वी करणे गरजेचे आहे. पाऊस सुरू झाला आणि धरणाची पाणीपातळी काढली तर जॅककेलचे काम करणे शक्य होणार नाही. जॅककेलचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे मक्तेदारापुढे मोठे आव्हान आहे. तत्पूर्वी हे काम न झाल्यास पाकसाळ्यानंतर पाणीपातळी कमी झाल्यानंतर हे काम हाती घ्यावे लागेल. यामुळे हे काम पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.