कोरोनाच्या नवा स्ट्रेनचा ब्रिटनमध्ये धुमाकूळ; 24 तासात 1,564 लोकांचा मृत्यू

जागतिक साथरोग कोरोनावर अद्याप पूर्ण नियंत्रण मिळवता आलेले नाही. संपूर्ण जगात त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. तर ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन मिळाल्यानंतर जगभरात पुन्हा दहशत निर्माण झाली आहे.

यूकेमध्ये कोरोना संक्रमित लोकांची संख्या दररोज वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे 45 हजारांहून अधिक प्रकरण समोर आले होते. गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक वेगानं वाढल्याचे पाहायला मिळाले. ब्रिटन जगातील पांचवा सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेला देश बनला आहे.

यूकेमध्ये 24 तासात 47 हजाराहून अधिक कोरोना प्रकरण समोर आले. वर्ल्डोमीटरच्या रिपोर्टनुसार ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत 47,525 कोरोना रुग्ण आढळले असून 1,564 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 32 लाख 11 हजार हून अधिक लोकांना कोरोना झाला आहे. तर एकूण 84,767 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच 14 लाख 6 हजार 967 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या यूकेमध्ये 17,19,842 अॅक्टिव केस आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या