#AYODHYAVERDICT- आता निवडणुका मंदिराच्या मुद्द्यावर लढल्या जाणार नाही – उमा भारती

927
uma-bharti

भाजपच्या ज्य़ेष्ठ नेत्या उमा भारती यांनी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राम मंदिर उभारणीसाठी सुरुवातीपासून लढा देणाऱे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवणी यांना या यशाचं श्रेय दिलं आहे. राम मंदिराच्या निकालावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया देत असताना ‘आता राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूका लढवता येणार नाहीत’, हे देखील सांगायला त्या विसरल्या नाहीत.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत उमा भारती म्हणाल्या ‘या पुढे राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूका लढवल्या जाणार नाहीत तर आता वास्तविक परिस्थिती, खरे मुद्दे अन्न,वस्त्र,निवारा, शिक्षण अशा मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल’, असे उमा भारती यांनी सांगितले.

याआधी उमा भारती यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी लालकृष्ण आडवाणी यांचे मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. ‘राममंदिराचा मुद्दा पहिल्यांदा उपस्थित करत आडवाणी यांनी देशात राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतता अधोरेखीत केली. आडवाणी यांनी राममंदिरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. देशात राष्ट्रवादाची भावना रुजवण्यात आणि धर्मनिरपेक्षता जोपसण्यामागचे मूळ कारण आडवाणी असल्याचे’ भारती यांनी स्पष्ट केले

आपली प्रतिक्रिया द्या