संयुक्त राष्ट्राचा हिंदुस्थानला सलाम, 55 देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यास पुढाकार

1349

अमेरिकेसह कोरोनाग्रस्त जवळपास 55 देशांना औषध पुरवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या हिंदुस्थानला संयुक्त राष्ट्राने सलाम ठोकला आहे. हिंदुस्थानने अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध पुरवले आहे. हिंदुस्थानच्या या पुढाकाराचे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी कौतुक केले आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे कोरोनावरील प्रभावी औषध मानले जात आहे. केंद्र सरकारने अलीकडेच या औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवून अमेरिकेसह विविध 55 देशांच्या कोरोनाविरोधातील लढय़ाला बळ दिले आहे. हिंदुस्थानच्या या भूमिकेला संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी भरभरून दाद दिली आहे, अशी माहिती त्यांचे प्रवत्ते स्टीफन यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांत विविध देशांकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची मागणी प्रचंड वाढली आहे.

हिंदुस्थान या देशांना पुरवणार औषध
अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर व अन्य देश.

आपली प्रतिक्रिया द्या