स्वच्छतागृहांतील अस्वच्छता पाहून हेमांगी भडकली!

925

आजवर अनेक मराठी कलाकारांनी नाटय़गृहांमधील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेबाबत, अस्वच्छतेबाबत आवाज उठवला आहे. परंतु अशीच परिस्थिती स्त्री- पुरुषांसाठी कॉमन असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येही पाहायला मिळते. याबाबत अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवरून एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. पुरुषांनी पाश्चात्य पद्धतीच्या स्कच्छतागृहांचा योग्य पद्धतीने वापर न केल्याने स्त्रियांना कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागतो याकडे पोस्टमधून तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आपला संताप व्यक्त करताना हेमांगी म्हणाली, हल्ली बऱयाच कामाच्या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट (कमोड) असतात. त्यात बऱयाचदा स्त्री-पुरुषांसाठी कॉमन टॉयलेट्स असतात. पुरुष मूत्र विसर्जन करताना कमोडच्या रिंगवर रांगोळी करून ठेकतात. ते बघूनच अंगावर शिसारी येते. अशा घाणेरडय़ा कमोडचा वापर स्त्रिया कशा करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? होत नसेल तर करावा. स्त्रीपुरुष दोघांनी कमोड कसे वापरावे हे कळत नसेल तर न लाजता विचारावे कारण याचा थेट संबंध दोघांच्याही हायजीन आणि हेल्थशी असल्याचे ती म्हणाली.

शाळांमधून धडे द्या!

बरेच पुरुष योग्य पद्धतीने पाश्चात्य शौचालयांचा वापर करत नाहीत. त्यामुळे स्त्रियांना अडचणींचा सामना करावा लागतो. मासिक पाळी दरम्यान या गोष्टीचा त्यांना सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे पाश्चात्य शौचालय कसे वापरावे याचे ज्ञान शाळेत किंवा घरातच पालकांनी लहान वयात आपल्या मुला-मुलींना द्यायला हवे, असे हेमांगी म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या