महिला अंडर-17 तिरंगी फुटबॉल : स्वीडनचा थायलंडवर 3-1 असा विजय

336

अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलात खेळवण्यात येत असलेल्या महिला अंडर-17 आंतरराष्ट्रीय तिरंगी फुटबॉल स्पर्धेत रविवारी युरोपियन स्वीडन संघाने आशियाई थायलंड संघावर 3-1 अशा गोलनी विजय मिळवत स्पर्धेतील आपला सलग दुसरा विजय नोंदवला. या विजयाने स्वीडनने अंतिम फेरीत मजल मारली आहे. मात्र बलाढय़ स्वीडनला स्तुत्य झुंज देत थायलंडने उपस्थित फुटबॉलशौकिनांची मने जिंकली.  आता मंगळवारी खेळवल्या जाणार्‍या तिसर्‍या लढतीत विजय मिळवणारा संघ स्वीडनला अंतिम लढतीत भिडेल.

अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघ आणि आशियाई फुटबॉल महासंघ यांनी युरोपियन फुटबॉल संघटनेच्या मदतीने आयोजिलेल्या या महिला तिरंगी फुटबॉल स्पर्धेला फुटबॉलशौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बलाढय़ स्वीडिश महिला फुटबॉल संघाने लढतीच्या आरंभापासूनच आक्रमक पवित्र घेत प्रतिस्पर्धी संघावर सतत वाढत दबाव ठेवला  होता.

आपली प्रतिक्रिया द्या