युवा जगज्जेतेपदाचा फैसला आज, हिंदुस्थान-बांगलादेश किताबी लढतीत भिडणार

गतविजेती ‘टीम इंडिया’ युवा विश्वचषक (19 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेतील जगज्जेतेपद राखणार की बांगलादेशच्या रुपाने नवा जगज्जेता मिळणार याचा फैसला आज, 9 फेब्रुवारीला होणार आहे. बांगलादेशने न्यूझीलंडचा पराभव करून प्रथम या स्पर्धेच्या फेरीत धडक दिली आहे. हिंदुस्थानने याआधी चार वेळा जगज्जेपदाचा करंडक उंचावला असून पाचव्या जगज्जेतेपदापासून ते केवळ एक पाऊल दूर आहेत.

पहिल्या उपांत्य लढतीत ‘टीम इंडिया’ने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठलेली आहे. बांगलादेशने सुरुवातीच्या संकटातून सावरत न्यूझीलंडवर सनसनाटी विजय मिळवून जेतेपदाची लढत पक्की केली. आज ज्या सेन्यूस पार्कवर जेतेपदाची लढत रंगणार आहे त्या मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक आहे, मात्र काही वेळानंतर या खेळपट्टीची उसळी कमी होते. याच मैदानावर हिंदुस्थानने पाकिस्तानला 10 गडी राखून धूळ चारली होती. उद्याच्या लढतीवर पावसाचे सावट असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

– हिंदुस्थान – यशस्वी जैसवाल, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), सिद्धेश कीर, अथर्व अंकोलेकर, रवी बिष्णोई, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह.

– बांगलादेश – परवेज हुसैन इमॉन, तंजीद हसन, महमूद-उल-हसन जॉय, तौहीद हिरीदॉय, शहादत हुसैन, अकबर अली (कर्णधार/यष्टिरक्षक), शमीम हुसैन, रकीबुल हसन, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन शाकिब, हसन मुराद.

– सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस्वरून दुपारी 1.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या