Under 19 World Cup Final – 30 चेंडूत 150 धावा, हरारेमध्ये हिंदुस्थानच्या ‘वैभव’ची तडाखेबंद फलंदाजी; गोऱ्या साहेबांची गोलंदाजी फोडून काढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद फलंदाजी करत 80 चेंडूत 175 धावा ठोकल्या. यात त्याने 15 षटकार व 15 चौकरही मारले. सुरुवातीपासून धुवाँधार बॅटिंग करणाऱ्या वैभवने गोऱ्या साहेबांची गोलंदाजी फोडून काढत टीम इंडियाला मोठी धावसंख्या रचायला मदत केली.

अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात आज टीम इंडिया व इंग्लंडमध्ये हरारे येथे लढत होत आहे. या सामन्याचे नाणेफेक जिंकत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या 20 धावा झालेल्या असतानाच टीम इंडियाला अॅरॉन बाद झाल्याने पहिला धक्का बसला. मात्र अॅरॉनसोबत सलामीला आलेल्या वैभवने तडाखेबंद फलंदाजी करत टीम इंडियाची धावसंख्या 50 षटकात 411 पर्यंत पोहोचवली. वैभवला उत्तम साथ लाभली ती कर्णधार आयुष म्हात्रे याची. आयुषने 51 चेंडूत 53 धावा केल्या.