बेरोजगार तरुणाने चिमुरड्याचा गळा कापून बायकोला दिला फास, गळफास घेऊन केली आत्महत्या

कामधंदा मिळत नसल्यामुळे एका तरुणाने अवघ्या एक वर्षाच्या मुलावर चाकू फिरवून खून केला. त्यानंतर बायकोला गळा दाबून मारून स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात कदम वाक वस्तीवर घडली आहे.  हनुमंत शिंदे वय 38 , पत्नी प्रज्ञा हनुमंत शिंदे वय 28आणि मुलगा शिवतेज हनुमंत शिंदे वय 1 अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबीय कदम वाक वस्तीवर राहायला होते. मागील काही दिवसांपासून हनुमंत यांना रोजगार मिळत नव्हता. त्यामुळे त्याने कंटाळून एक वर्षाच्या मुलावर चाकू फिरवून खून केला. त्यानंतर बायकोचा गळा दाबून खून केला. मग हनुमंत याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिंदे कुटुंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून मागील काही दिवसांपासून ते लोणी काळभोर परिसरात कदम वाक वस्तीवर राहत होते. मात्र, बेरोजगारी निर्माण झाल्याने हनुमंत यांनी संपूर्ण कुटुंब संपवून टाकले आहे. घटनेनंतर सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते आणि इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या