देशात प्रचंड बेरोजगारी, रेल्वेतील 64 हजार नोकऱ्यांसाठी तब्बल 1 कोटी 87 लाख अर्ज

पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या आणि लवकरच हिंदुस्थान जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात प्रचंड बेरोजगारी वाढल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. 2024मध्ये रेल्वेने 64 हजार 197 पदांची भरती जाहीर केली होती. त्या भरतीसाठी तब्बल 1.87 कोटी अर्ज आले आहेत. रेल्वे मंत्रालयानेच लोकसभेत ही आकडेवारी दिली आहे.

n सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सध्या तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. आरपीएफसाठी तब्बल 45 लाख 30 हजार 288 इतके विक्रमी अर्ज आले. तर इतर पदांसाठी सरासरी 1 हजार 76 अर्ज आले होते, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.