राहुल गांधी यांनी डोकलामचा मुद्दा उपस्थित करताच सरकारची भंबेरी; लोकसभेत गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलत असताना संसदेत गादारोळ झाला आहे. भाषणात राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, नरवणे यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की डोकलाममध्ये आणि हिंदुस्थानी सीमेमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. राहुल गांधी यांनी नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करताच लोकसभेत गोंधळला सुरुवात झाली. राहुल गांधी यांनी डोकलामचा उल्लेख करताच सरकराच भंबेरी उडाल्याचे दिसून आले.

राहुल गांधी बोलत असतानाच सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना रोखले आणि जे पुस्तक प्रकाशितच झालेलं नाही ते पुस्तक तुम्ही सभागृहात कसं काय वाचता? असा प्रश्न सिंह यांनी विचारला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही तर मग ते अधिकृत कसं काय मानलं जाणार? त्यावर हे पुस्तक १०० टक्के नरवणे यांचं आहे आणि अधिकृत आहे असं राहुल गांधी स्पष्ट करताच गोंधळाला सुरुवात झाली. राहुल गांधींनी माजी लष्करप्रमुख सेवानिवृत्त जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत डोकलामचा मुद्दा मांडला. हे पुस्तक प्रकाशित झालेले नाही त्यामुळे संदर्भ देता येत नाही, असा आक्षेप राजनाथ सिंह यांनी घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जनरल नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, असे स्पष्ट केले.

राहुल गांधी म्हणाले मी या पुस्तकाचा उल्लेख करणार नव्हतो पण आमच्या खासदारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्यामुळे माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. त्यानंतर माझ्या हातात एक मॅगझीन आहे, त्या मॅगझीनमध्ये लेख आहे तो मी सांगू इच्छितो, असे ते म्हणाले. मोदी सरकार घाबरत नसेल तर मला बोलू का दिलं जात नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.

राहुल गांधी यांनी डोकलाममध्ये चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला. मला वेळ दिल्याबद्दल सभागृहाचे धन्यवाद, अशी सुरुवात राहुल गांधी यांनी केली. काँग्रेसवर अनेक आरोप करण्यात आले आहेत, त्यावर मी आता बोलणार नाही. त्याऐवजी मी काही वाचून सुरुवात करतोय. माजी लष्करप्रमुख नरवणे यांचं हे पुस्तक आहे. तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका मी काय वाचतोय. यावरुन समजेल कोण देशभक्त आहे कोण नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

4 चिनी रणगाडे डोकलाम येथे हिंदुस्थानच्या भूमीवर येत होते. ते 100 मीटर दूर होते, असं राहुल गांधी वाचताना म्हणाले. त्यावर राजनाथ सिंह लगेच उठून उभे राहिले आणि म्हणाले, जे पुस्तकच प्रकाशित झालं नाही, त्यावर बोलू नये, राजनाथ सिंह यांनी उभं राहून राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि पुस्तकाचा विरोध केला. राजनाथ सिंह बोलले की, लोकसभेत एनडीए आणि विरोधी पक्षांमध्ये गदारोळ सुरु झाला. या दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी संरक्षण मंत्र्यांशी सहमती व्यक्त केली. राहुल गांधी म्हणाले की, मी जे म्हणतोय ते सर्व नरवणे बोलले आहेत. त्यांचं पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाही. सत्ताधारी म्हणतात की ते दहशतवादाविरुद्ध लढतायत. पण एक कोट वाचण्यावर इतके घाबरतात. यात असं काय आहे, ज्याला इतके घाबरतायत. त्यांना भीती नसेल तर मला बोलू द्या. वास्तवात हे लोक घाबरलेले आहेत. मी जे बोलतोय ते चीनशी संबंधित आहे. जे डोकलाममध्ये चीनने हिंदुस्थानसोबत केलं, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींच्या या वक्तव्याने सरकारची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले.