अशोक चव्हाणांकडे अमित शहांना ‘आदर्श’ मेजवानी

पहलगाम घटनेनंतर राजधानी दिल्ली अस्वस्थ असताना देशाचे ‘फोडफोडी’ फेम गृहमंत्री अमित शहा हे किरकोळ पक्षप्रवेशासाठी नांदेडात आले होते. कोरड्या योजनांचा पाढा वाचल्यानंतर अमित शहा यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे ‘आदर्श’ मेजवानीवर ताव मारला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खास अशोक चव्हाणांच्या आग्रहावरून नांदेडात आले होते. अमित शहा यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची हवा यानिमित्ताने करण्यात आली. मात्र अमित शहा यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बी. आर. कदम आणि चव्हाणांचे नातलग डी. पी. सावंत वगळता कोणीही मोठा नेता भाजपच्या गळाला लागला नाही.