‘जन गण मन’च्या आधी वाजणार ‘वंदे मातरम्’, 3 मिनिटं 10 सेकंद उभे राहणे अनिवार्य; केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताबाबत नविन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन नियमांनुसार, आता सरकारी कार्यक्रम, नागरी सन्मान सोहळे आणि शाळांमध्ये देखील 3 मनिट 10 सेकंदाचे 6 कडव्यांचे राष्ट्रगीत गाणे किंवा वाजवणे अनिवार्य असणार आहे. आतापर्यंत सर्व कार्यक्रमांमध्ये मंचावर गायले जाणारे राष्ट्रगीत अपूर्ण असल्याचे या आदेशात म्हटले असून, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी सुरूवातीला लिहिलेल्या राष्ट्रीय गीताच्या सर्व ओळींचा यात समावेश करण्यात आला आहे.

गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, जेव्हा कधी राष्ट्रगीत गायले किंवा वाजवले जाईल, तेव्हा सर्वांनी ‘सावधान’ स्थितीत उभे राहून त्याचा आदर करणे आवश्यक आहे. जर एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रगीत (जन गण मन) आणि (‘वंदे मातरम्’)दोन्ही वाजवले जाणार असतील, तेव्हा ‘वंदे मातरम्’ सर्वप्रथम वाजवले जाईल. कोणत्याही चित्रपट गृहात वंदे मातरम् वाजवले जात असताना उभे राहणे अनिवार्य नसले तरी सरकारी कार्यक्रमांमध्ये उभे राहणे आवश्यक आहे. तसेच रील किंवा डॉक्युमेंटरीचा भाग म्हणून गाणे वाजताना प्रेक्षकांना उभे राहण्याची गरज नाही, कारण यामुळे गोंधळ निर्माण होऊन राष्ट्रीय गीताची प्रतिष्ठा कमी होऊ शकते.

कोणत्या ठिकाणी नियम लागू होणार:
– राष्ट्रपतींचे औपचारिक कार्यक्रम आणि सरकारद्वारे आयोजित इतर कार्यक्रमांमध्ये आगमन आणि प्रस्थान केल्यानंतर
– ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर राष्ट्रपतींचे राष्ट्राला संदेश देण्यापूर्वी आणि नंतर
– राज्यपाल, उपराज्यपाल यांचे औपचारिक राज्य कार्यक्रमांना आगमन झाल्यावर आणि प्रस्थान केल्यानंतर
– नागरी स्वागत समारंभात
– जेव्हा पथसंचसनात राष्ट्रध्वज फडकवला जाईल
– सरकारने आयोजित केलेले इतर विशेष कार्यक्रम देखील राष्ट्रगीत गायले जाईल
– नागरी सन्मान समारंभात

वंदे मातरम् अधिक लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी संसदेत या विषयावर चर्चा झाली होती. राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील विविध चित्ररथांच्या प्रदर्शनानंतर, आता हा आदेश लागू करण्यात आला आहे.