वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्र्याला निवडणूक आयोगाची नोटीस

637

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप खासदार आणी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त घोषणा दिल्या आहेत. या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. दिल्लीतील एका सभेत ठाकूर यांनी देश के गद्दारों को गोली मारो सालो को अशा घोषणा दिल्या. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्लीत एक सभा होती. सभेत त्यांनी देश के गद्दारों को गोली मारो सालो को अशा घोषणा दिल्या. त्यावर दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच काँग्रेसनेही त्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या