हिंदुस्थानची अवस्था युरोपसारखी नाही- आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

946

कोरोना संकटाच्या काळात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिल्लीच्या डॉ. राम मनोहर लोहिया इस्पितळाचा दौरा केला. दौर्‍यात त्यांनी डॉक्टर्स आणि इतर कर्मचार्‍यांशी संवाद साधला. आपल्या डॉक्टरांमुळे हिंदुस्थानची अवस्था युरोपसारखी नाही असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व कर्मचार्‍यांचे कौतुक केले.


डॉ. हर्षवर्धन डॉक्टर आणि इस्पितळाच्या कर्मचार्‍यांना म्हणाले की, कोरोनाचे संकट एका वादळासारखे आले. परंतु हे वादळ तुम्ही शमवले. कोरोना संकट काळात सोशल डिस्टसिंग महत्त्वाचे असते. परंतु धोका पत्करुन तुम्ही काम करत आहात त्याबद्दल मला तुमच्यावर गर्व आहे.” तसेच देशातील आरोग्य संस्था एकत्र येऊन काम करत आहेत असे हर्षवर्धन म्हणाले. कोरोना संक्रमित लोकांची चाचणी केली जात आहे आणि चाचणीच्या प्रक्रियेचा वेगही वाढवला जात आहे.

मंत्री हर्षवर्धन म्हणाले की, 31 डिसेंबरपासूनच न्युमोनिया सारखे गंभीर आजार समोर येत आहे असे चीनने म्हटले होते. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याच्चे म्हटले होते. हिंदुस्थानने

8 जानेवारीपासूनच उपाययोजना करण्यास सुरूवात केली होती. विमानतळावरच प्रवाशांची तपासणीस सुरू केली होती.  हिंदुस्थानमध्ये आतापर्यंत 2301 जणांना कोरोनाची लागण झालेली असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या